संत एकनाथकडून उसाला २ हजार ८०० रूपये टन भाव

Foto
६ कोटी ५३ लाख रुपये केले बँकेत वर्ग, सीए सचिन घायाळ यांनी दिली माहिती

पैठण, (प्रतिनिधी): श्री संत सचिन घायाळ शुगरचा गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये ०१ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर व १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दोन पंधरवाड्यात गाळपास आलेल्या उसाला पहिला हप्ता म्हणून २८०० रुपये प्रति मे.टन भाव प्रमाणे एकूण ०६ कोटी ५३ लाख रुपये व्यंकटेश मल्टीस्टेट पैठण शाखेत वर्ग केले आहे अशी माहिती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते सीए सचिन घायाळ यांनी दिली आहे.

बोलल्याप्रमाणे आमच्या साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२०२६ मध्ये गळीतास आलेल्या ऊसाला तालुक्यात उच्चांकी पहिला हप्ता २८०० रुपये प्रति मे टन याप्रमाणे शेतकऱ्यांना वर्ग केला आहे. तसेच १५ डिसेंबर २०२५ पर्यंत ऊस तोडणी वाहतूक बिल सुद्धा मुकारदमांच्या खात्यावर वर्ग केले आहे. मागील गळीत हंगामात काही विघ्नसंतोषी राजकारण्यांनी विनाकारण श्री संत एकनाथ कारखान्याच्या शेतकऱ्यांना त्रास होण्याच्या उद्देशाने सीए सचिन घायाळ यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु राजकारण्यांनी तयार केलेल्या अडचणीवर मात करून सीए सचिन घायाळ यांनी श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना यशस्वीरित्या चालल्यामुळे पैठणच्या शेतकऱ्यांना आधार
मिळाला असल्याचे प्रतिपादन माजी सरपंच प्रकाश म्हस्के व माजी सभापती संजय बोबडे यांनी केले. 

 श्री संत एकनाथ कारखान्याने पैठण तालुक्यातील शरद सहकारी साखर कारखाना, गुळवे, शिवाजी ऍग्रो गुड युनिट यांच्या पेक्षा जास्त व छत्रपती संभाजी राजे, समर्थ साखर कारखान्यांच्या बरोबरीने पहिला हप्ता २८०० रुपये प्रति मे टन इतका काढल्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार आम्ही केला आहे.

मागील हंगामात आम्ही उच्चांकी भाव देऊन सर्व शेतकऱ्यांचे बिल दिले असल्याचे सीए सचिन घायाळ यांनी सांगितले. याप्रसंगी संत एकनाथ चे चेअरमन गणेश घायाळ, व्हाईसचेअरमन आबासाहेब मोरे, संचालक एकनाथ नवले, शेतकरी रावसाहेब घोडके, हारुण बागवान, राजू नवधर, सतीश गलधर, बाबासाहेब कोकाट, अंजनराव चाळक, आत्माराम दिलवाले, अन्सार बागवान, दत्ता मोरे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.